रत्नागिरी : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमीत्त युगंधरा फाऊंडेशन इचलकरंजी व कोल्हापुर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मुलींच्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाला यश प्राप्त झाले आहे. या स्पर्धा मुलींच्या तीन लहान गटांमध्ये आयोजीत करण्यात आल्या असून त्यामध्ये खुल्या गटामध्ये कु.सायली संतोष मुंगणेकर हीने ५७ ते ६० किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक तसेच लहान गटामध्ये कु.रिया विष्णू रामाणे हीने ४८ ते ५० किलो वजनी गटामध्ये कास्य पदक, कु.अक्षता सुनिल झोरे हीने ५२ ते ५४ वजनी गटामध्ये रौप्य पदक, कु.गायत्री आनंद चौगुले हीने ५८ ते ६० किलो वजनी गटामध्ये कास्य पदक, व कु.अनुष्का संतोष कदम हीने ६० ते ६२ किलो वजनी गटामध्ये कास्य पदक पटकावले आहे. जिल्हा संघाला तृतिय क्रमांकाचे पारितोषीक व चषक प्राप्त झाले आहे. या संघामधये सांगली, सातारा, कोल्हापुर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भारत शिक्षण मंडळ, कोतवडे हायाकुल व रा.भा.शिर्के प्रशाला अशा शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने अध्यक्ष युयुत्सू आर्ते व सचिव वैभव वनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. संघटनेच्या इतर पदाधिकारी व सदस्यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले आहे व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.