मुंबई : दि. १४ : सरकारने देशातील ‘MSME’उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे विनातारण हमी कर्ज उपलब्ध केले आहे. यामुळे ४५ लाख ‘MSME’ला याचा फायदा होईल. आज सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील १५ महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी जाहीर केल्या होत्या. मात्र, त्याचा भांडवली बाजारावरील प्रभाव कमी होत गेला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. आजच्या सत्रात आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर बजाज फायनान्स, नेस्ले, भारती एअरटेल या शेअरमध्ये तेजी दिसून आली.