रत्नागिरी :  भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या प्रहरामुळे अखेरीस रत्नागिरीवासींना गृहीत धरणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोविड रुग्णालय कोणतेही कारण न देता 24 तासात सुरू करावेच लागले. मात्र उदघाटन झाले असले तरीही आता या रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग कधी मिळणार याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरीकरासाठी आरोग्य सेवा महत्वाची नाही तर शिवसेनेच्या नेत्यांचे उदघाटन केलेले फोटो माध्यमामध्ये प्रसिद्ध होणेच महत्वाचे आहे या शिवसेनेचे नेते, मंत्री यांच्या हट्टामुळे महिला रुग्णालयातील कोविड रुग्णालयाचे उदघाटन सातत्याने पुढे ढकलले जात होते. कधी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना वेळ नाही तर कधी पालकमंत्री अनिल परब याना वेळ नाही, अशी स्थिती होती. यामध्ये आरोग्य ही अत्यावश्यक सेवा असून ती या महामारीच्या काळात तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे याचा विसर प्रसिद्धसाठी रत्नागिरीकरांना गृहीत धरलेल्या शिवसेनेला आणि त्यामुळेच प्रशासनाचा पडला होता.मात्र भाजपा नेते निलेश राणे यांनी या शिवसेनेच्या कारभाराचे शनिवारी वाभाडे काढले, कोविड रुग्णालयाची सद्यस्थिती जनतेसमोर मांडली. 18 कोटींचा खर्च दाखवलेल्या या कोविड रुग्णालयामध्ये गैरसोयी जनतेसमोर उघड तर केल्याच परंतु एकूणच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबद्दल राज्यकर्ते किती गंभीर आहेत आणि कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक सुरू झाला असतानाही जिल्ह्याला किती गोष्टी अद्याप उपलब्धच नाहीत याची वस्तुस्थिती मांडली. शिवसेना नेत्यांचा स्वप्रसिद्धीसाठी चाललेला अट्टहास त्यांनी मांडला.निलेश राणे यांचा हा सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार झाला. त्यामुळे यावेळी कोणतेही कारण ने देता हा रुग्णालय उदघटनाचा अखेरीस चौथा वेळी काढलेला मुहूर्त साधत शेवटी शिवसेनेला हे उदघाटन पार पाडावेच लागले. यावेळी दिलेली वेळ मंत्र्यांनी बदलली मात्र दिवस बदलण्याचे धाडस यावेळी त्यांना झालं नाही. निलेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे 24 तासात रुग्णालय सुरू झाल्याने स्थानिक जनतेमधून समाधान व्यक्त होत असून सध्या याच आक्रमक भूमिकेची गरज असून गृहीत धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाग करण्याची आवश्यकता आहे अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत. दरम्यान रुग्णालय सुरू झाले आता कर्मचारी भरा आणि त्याचा उपयोग जनतेसाठी करा अशी मागणी केली जात आहे.