रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आयोजीत माझे घर-माझी जबाबदारी अभियानाच्या अनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी नुकतेच ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद सदस्य यांच्याबरोबर चर्चा केली. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. माझे कुटूंब-माझी जबाबदारी अभियानात चांगले काम करणार्‍या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे हे नावारुपाला येत आहेत. आरोग्य यंत्रणा योग्य पध्दतीने काम करत आहेत. कोव्हिड प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आवश्यक आहे. मास्क लावण्यावर बंधने आणण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिल्या आहेत. गुन्हा सारखा करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकी दोन असे मास्क कोव्हीड यंत्रणेतून देण्यात येणार आहेत प्रत्येक घरात सॅनिटायझर देण्यात येणार आहे. ऑक्सीजन रायगडवरून येतोय. अधिकारी राजेंद्र शिंगणे यांचे योगदान आहे. मास्क वॉशेबल असणार आहे. मास्क न घालणा-यांवर पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे अशी माहीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी मतदारसंघात आमदार निधीतून, ग्रामपंचायत फंडातून मास्कचे वाटप करण्यात येणार आहेत. फिजिशिअन, एमबीबीएस डॉक्टरची महिला रुग्णालयात काम करत आहेत. खासगी डॉक्टर शोधून त्यांन मानधन दिले जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिव्हीलला नर्स पुरवले आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांचे तत्काळ वेतन देण्याच्या प्रशासनाला सुचना देण्यात आल्या असल्याची माहीती ना.उदय सामंत यांनी दिली आहे.नाणारला रिफायनरी होणार नाही हे निश्‍चित आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी बोलत रहावे. त्याचा नाणार परिसरातील जनतेवर काहीही परिणाम होणार नाही असे मतही ना.उदय सामंत यांनी व्यक्त केले.