रत्नागिरी, दि. ०६ : रत्नागिरी येथील जेएसडब्ल्यू फाऊंडेशन आणि जिल्हा विज्ञान शिक्षण मंडळाच्यावतीने जिल्हा मर्यादीत औषधी वनस्पती नोंद वही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींबद्दल जागरुकता निर्माण करणे, आपल्या सभोवतालच्या औषधी वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे व मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्याचे फायदे याची माहीती संकलन करणे, विद्यार्थ्यांची निरिक्षण शक्ती वाढवणे, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि वैज्ञानिक शोधक वृत्ती वाढीस लावणे, रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्मीळ व दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे ज्ञान, शोध व औषधी गुणधर्म याचे माहिती संकलन व उपयोग जाणुन घेणे हे या स्पर्धेमागील मुख्य ऊद्दिष्ट आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत नोंदवह्या पाठवण्यात याव्यात. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षण मंडळाचे कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.