रत्नागिरी : दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक  राऊत यांनी आज कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री, मा.ना. श्री. दादा भुसे यांची भेट घेऊन चिपळूण तालुक्यातील नारायण तळे जवळ असलेल्या सरकारी जमिनीतील २५ गुंठे जमिन माजी सैनिक संघ, चिपळूण यांना सैनिक भवन आणि भव्य शहिद जवान स्मारक बांधण्यासाठी मिळावी, अशी विनंती केली आहे. तरी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.श्री.दादाजी भुसे यांनी खासदार श्री विनायकजी राऊत यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत. त्यावेळी उपस्थित कुडाळ विधानसभेचे आमदार श्री वैभव नाईक व नरेंद्र बोंडेकर उपस्थित होते.