रत्नागिरी , दि. ३० :  रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार मिलींद यशवंत राऊळ यांचे वयाच्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते चिपळूण पोफळी महानिर्मिती कंपनीच्या सुरक्षा गार्डवर कर्तव्य बजावत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे रहिवासी होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलिंद राऊळ हे २०००साली पोलीस दलात रुजू झाले. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असताना पोफळी महानिर्मिती कंपनीच्या सुरक्षा गार्ड वर सेवा बजावत असताना गुरुवारी २९ रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चिपळुणातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले असता त्यांचे निधन झाल्याचे समोर आले.

मिलिंद राऊळ यांच्या पश्चात आई पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेने राऊळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.