रत्नागिरी : दि ०७ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना न्याय मिळाला आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५७ सुरक्षा रक्षकांना व अन्य काही कर्मचा-यांना मार्च महिन्यापासून रखडलेला पगार आता मिळणार आहे. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षक व अन्य काही कर्मचा-यांना पगार मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली. आत्तापर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची बात देखील यावेळी अनिकेत पटवर्धन व नंदू चव्हाण यांच्या लक्षात आली. या सर्व समस्या लक्षात आल्यानंतर अनिकेत पटवर्धन व नंदू चव्हाण यांनी हा विषय हातात घेऊन त्या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिका-यांशी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापुर व पुणे या त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांशी पाठपुरावा करण्यास त्यांनी सुरुवात केली. सततच्या पाठपुराव्यानंतर आता यश आले आहे. या सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार खात्यात जमा झाला आहे. व उर्वरित महिन्यांचा आठवडाभरात खात्यात जमा होणार असल्याची माहीती नंदू चव्हाण यांनी दिली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे या कर्मचा-यांना मानधन मिळणार आहे. याबद्दल कर्मचारी निलेश राणे यांचे आभार व्यक्त करत आहेत.