दिल्ली : दि ०७ :  भारत सरकारच्या क्वॉयर बोर्डाचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांची  नुकतीच दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात सिंधुदूर्ग येथील भाजपा नेते व माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट घेतली. कोकण विभाग आत्मनिर्भर भारत योजनेसाठी सिंधुदुर्ग , रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी उत्तर या जिल्ह्यांमध्ये Coir क्लस्टर निर्माण करणे यावर विचार व चर्चा झाली. नारळाच्या सोडणांपासून काॅयर, नर्सरी कोकोपीट, पाय पुसणे, बेड, शोभिवंत वस्तू तसेच रस्ते बांधण्यासाठी Coir चा उपयोग मोठ्या प्रमाणात व्हायला हवा असे ते म्हणाले कोकणात (पालघर ते सिंधुदुर्ग) साधारण २५ कोटी नारळ पिक दरवर्षी येते एका क्लस्टर मध्ये किमान ५०० महिलांना रोजगार मिळाला तर पाच क्लस्टरच्या माध्यमातून कोकणामध्ये २५०० महिलांना रोजगार मिळू शकतो. राज्यसभा खासदार तसेच Coir बोर्डाचे सद्स्य खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी कोकण विकासाच्या या कार्यक्रमात हातभार लावण्याचे आश्वासित केले व लागणारी सर्व मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचे मान्य केले या विकास कामात कोकणच्या जनतेचे पाऊल आत्मनिर्भर कोकणातून आत्मनिर्भर भारत या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पा पर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.