रत्नागिरी, दि. ०७ : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी सर्व प्रथम उपस्थितांचे स्वागत करून नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या निमित्ताने मार्गदर्शन करताना अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्याचा आढावा घेत वर्तमान पिढीने त्यांचे कार्य आणि विचार अंगिकारावेत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे चालविला पाहिजे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वामन सावंत यानी मनोगत व्यक्त केले.

या निमित्ताने एन. एस. एस च्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रा. सळवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहिले.
कार्यमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. सुशिल साळवी यांनी केले.