रत्नागिरी, दि. ०७ : मंगळवारी नियोजित शेतक-यांसाठीच्या भारत बंदला रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. अशी माहीती उदय पेठे यांनी दिली आहे.

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्र्न मार्गी लागायला हवेत. शेतकरी जगला तर व्यापार उद्योग जगेल. आता शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या हाकेबाबत देशातील व्यापार उद्योगाचा पाठिंबा आहेच. बंद बाबत निर्णय घ्यायचा झाला तर ज्यांना या बंदला पाठिंबा द्यावयाचा असेल त्यांनी उत्स्फूर्तपणे आपला व्यवहार बंद ठेवावा. यावर संघटनेची बळजबरी असणार नाही. ज्यांना आपले व्यवहार चालू ठेवावयाचे असल्यास ते चालू ठेवू शकतात.शेतऱ्यांबद्दल व्यापाऱ्यांना सहानुभूती आहे. अशी माहीती उदय पेठे यांनी दिली आहे.