रत्नागिरी, दि. १३ : रत्नागिरीतील अधिक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात अवैध दारु विक्री व तत्सम कारवाया करुन ९४९ एवढे गुन्हे नोंद केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ.बाबू हमीद तडवी यांच्याकडे कारवायांच्या संदर्भात मागणी केली होती. यानुसार या कार्यालयातून सदरची माहीती देण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

यामध्ये वारस गुन्हे ४९५, बेवारस गुन्हे ४५४, अटक आरोपी ४९७, जप्त गावठी दारु १२५७८ लिटर, नाश रसायन ३१५३०५ लिटर, जप्त देशी मद्य २७९.०५ ब.लि., जप्त विदेशी मद्य ५०४.६६ ब.लि., जप्त बियर ८८.१२ ब.लि., जप्त परराज्यातील मद्य १७०८.१४ ब.लि., जप्त माडी ४४४ लिटर, जप्त वाहने ९ अशा प्रकारे कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच जप्त व नाश मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ४ लाख ९० हजार ५८२ रुपये एवढी किंमत आहे.