रत्नागिरी, दि. १५ : 14डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मौजे शिंपीपाडा-सुकसाळ येथिल कुलदीप पाटील, रा, शिंपिपाडा-सुकसाळ,अझीम खान सईद अख्तर, रा, माहीम-मुंबई व गुलाम शेख, जोगेश्वरी-मुंबई यांनी अनधिकृतपणे चालू केलेल्या प्रतिबंधित मागूर माशांच्या बीज केंद्रावर धडक कारवाइ करून 12000 रु, किमतीचे मागूर प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची अंडी नष्ट करण्यात आली व संबंधित तिघांवर भा, द,वि, 188 व 34 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात आली

यावेळी श्री आनंद पालव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे-पालघर, श्री दिनेश पाटील, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, तसेच सहा,मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, श्री सुरेंद्र गावडे, श्री संदीप जाधव, तसेच पोलीस हवालदार श्री पाटील व सहकारी त्याचप्रमाणे श्री जगताप, वाहन चालक, व सहाय्यक कर्मचारी श्री महाले यांनी कारवाईमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला