रत्नागिरी, दि. १५ : देवरुख मध्ये भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये सत्तावीस लोकांचीही कार्यकारणी असणार असून अध्यक्षपदी श्री प्रमोद शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी श्री सुनील कुडाळकर आणि श्री जयवंत खेडेकर, सचिवपदी श्री सुरेश किर्वे , सहसचिवपदी अभिजीत भाटकर, अशोक कोटकर, प्रवीण जाधव यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी श्री सुधाकर किर्वे, सहखजिनदार श्री गौरव लिंबूकर, श्री दिलीप जोयशी यांची निवड करण्यात आली.

कार्यकारणी च्या पहिल्या सभेमध्ये देवरुख शहरातील रिक्षा थांबे यांना अधिकृत परवानगी मिळवून देणे त्याचबरोबर सर्व रिक्षाचालकांचा अपघात विमा उतरवणे तसेच भारतीय जनता पार्टी या संघटनेच्या स्तरावर दानशूर व्यक्तींच्या मदतीने फंडाची उभारणी करून संकट काळी रिक्षा व्यवसायिकांना त्यातुन मदत करणे , त्याच बरोबर राज्य शासनाकडे रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळ ची निर्मिती साठी पाठपुरावा करणे या सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करण्याचे ठरविण्यात आले.