रत्नागिरी, दि. १७ : टेनिस क्रिकेट अससोएशन ऑफ महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट अससोएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 4 थी खुला गट पुरुष व महिला  स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला*

कोच कुणाल हळदणकर आणि टीमची कर्णधार राधिका घाटये हिच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हाने तृतीय क्रमांक पटकावला . 11 ते 13 डिसेंबर 2020 रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या सिंधुदुर्ग महिला संघाने आपल्या नावाचा झेंडा रोवला. चांगला खेळ करत तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये 6 महिला संघांनी सहभाग घेतला होता । 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी यजमान नाशिक हा संघ विरोधात उभा होता । प्रथम नाणेफेक जिंकून सिंधुदुर्ग जिल्हाने क्षेत्ररक्षण स्वीकारले । सुगंधा घाडी , प्रणाली खोबरेकर, पूर्वा बाकाळकर , आणि राधिका घाटये यांनी चांगली गोलंदाजी करत नाशिक संघाला फक्त 28 धावांवर रोखले । 29 धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज पूर्वा बाकाळकर आणि प्रणाली खोबरेकर यांनी नॉट आऊट 3 ओव्हर मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला। पूर्वा 14 धावा व प्रणाली 12 धावा काडून नाबाद राहिल्या। आणि आपला दणदणीत विजय संपन्न केला । क्रिकेट असोशिएशन ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 4 थी खुला गट पुरुष गट व महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला संघामध्ये राजापुराची कन्या कु. पूर्वा दिपक बाकाळकर हिने तृतीय क्रमांक पटकवला त्याबद्दल तिचे अभिनंदन करतांना भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ.शीतल पटेल, श्री सुनिल पटेल तसेच बूथ अध्यक्ष श्री सुजित पारकर आणि तिची आई सौ उषा बाकाळकर मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा