रत्नागिरी, दि. १८ : कोकणातील वॉटर स्पोर्टस सुरु करण्याच्या संदर्भात खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने वॉटर स्पोर्टसवर उपजीविका करणारे तरूण कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडले होते.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वॉटर स्पोटर्सच्या SOP ला मंजुरी दिली आहे. महाविकस आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयबाबत कोकणवासियांमधून अभिनंदन व्यक्त होत आहे.