राजापूर, दि. २९ : सध्या नाणार रिफायनरीला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. त्यातच आता रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका जमिअते उलेमा महाराष्ट्र संघटनेनही घेतलीय. तसेच आमदार राजन साळवी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची गर्जना कोकण विभागीय प्रमुख मोलाना डॉ एजाज पन्हळेकर यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षा पासून राजापूर रिफायनरी प्रकल्पाविरोधात अफ़वा पसरवून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करणाऱ्या कोकणी जनतेबाबत काहीच देणे घेणे नाही. अगोदर जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत विरोधी केला गेला होता. व आता रिफायनरीबाबत चुका केल्या जात आहेत. अशा भूमिकेमुळे आपल्या भागाचा विकास होणार नाही हे जनता चांगले ओळखत आहे असे मत जमिअते उलेमा महाराष्ट्रचे कोकणप्रमुख डॉ. मौ. एजाज पन्हळेकर यांनी व्यक्त केले आहे. आम्ही आ. राजन साळवी यांच्या भूमिकेचे स्वागत करत आहेत. कोकणी जनतेच्या भल्याचा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे. जमिअते उलेमा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे सर्व युनिटस यासाठी आमदार साळवी यांना प्रकल्प सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा असे आवाहन केले आहे.