रत्नागिरी |  प्रतिनिधी | दि. ०२ : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे याबाबत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व शिवसेनेत मतभिन्नता दिसून येत आहे. कॉंग्रेसने या विषयाला विरोध केला आहे. मात्र औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना कधीच धाडस करु शकत नाही, कारण शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. असा घणाघात माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहीती प्रसारित होत आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ही मागणी मंत्रालय स्तरावर गेलेली आहे. याच्या पाठिमागे नेमके कोण आहे ते माहीती नाही. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे किंवा तशी मागणी रेटून लावावी यासाठी शिवसेना धाडस करणार नाही. महाविकास आघाडी सरकारात शिवसेना आहे. सरकारचा मागिल वर्षभराचा कारभार पाहता हे सरकार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणारे आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र 

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना स्वत:हून काहि करायची कुवत नाही असे मला वाटते. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे. हा विरोध संभाजी महाराजांना आहे की शिवसेनेच्या भूमिकेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे यांनी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. शिवसेना हा कमकुवत झालेला पक्ष आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने डोळे वटारले तर शिवसेनेला मान खाली घालावीच लागेल. या विषयामध्ये मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेतील अस वाटत नाही. कारण त्यांनी लाचारिच पत्करली आहे. बाळासाहेबांनी मांडलेले विचार किंवा त्यांच्या भूमिका आताची शिवसेना कधीच पुढे चालवणार नाही. कारण आताची शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. अशी प्रतिक्रिया  माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.