रत्नागिरी | प्रतिनिधी | दि. ०८ : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोव्हिड लसिकरणासाठी डमी लाभार्थ्यांसाठी रंगीत तालीम पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सई धूरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व निरिक्षणाखाली ही रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन पार पडले.

असं होणार कोरोनाच लसीकरण 

यामध्ये एंट्री मध्ये व्हॅक्सीनेशन ऑफिसर १असेल. हा ऑफिसर लाभार्थ्याचे पल्स आणि तापमान तपसेल. व्हॅक्सीनेशन ऑफिसर २ हे सेक्युरिटी असतात. लाभार्थ्याचे के.वाय.सी. तपासून त्यांना व्हॅक्सीनेशन रुम मध्ये जाण्यासाठी माहीती देऊन जाण्यास सांगणार आहेत. व्हॅक्सीनेशन ऑफिसर ३ हे व्हॅक्सीनेटर ऑफिसर कडे म्हणजेच व्हॅक्सीन जे देणार आहेत त्यांच्याकडे घेऊन जाणार आहेत. व्हॅक्सीनेटर ऑफिसर हे त्या लाभार्थ्याला व्हॅक्सीन देणार आहेत. व्हॅक्सीन देऊन झाल्यानंतर व्हॅक्सीनेशन ऑफिसर ३ हे लाभार्थ्याला ऑब्झर्वेशन रुम मध्ये घेऊन जाणार. नंतर व्हॅक्सीनेशन ऑफिसर ४ हे त्या लाभार्थ्याचे नाव व येण्याची वेळ रजिस्टर मध्ये लिहुन घेऊन त्यांना काही त्रास होतोय का हे पहातात. काही त्रास असल्यास व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांना कळवतात. या नंतर या अर्ध्या तासात लाभार्थ्यास कोणताही त्रास होत असेल तर या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. जरी शासकीय रुग्णालयाची व्यवस्था अपुरी पडत असेल तर १०४ या नंबर वर संपर्क साधून योग्य ती व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. त्रास होत नसेल तर अर्ध्या तासानंतर त्यांना डिस्चार्च दिला जाईल व दुस-या डोस ची तारीख सांगण्यात येईल. तत्पूर्वी त्या लाभार्थ्यांना कोव्हिड पासून वाचण्याचे सल्ले दिले जातील.

जसे की मास्क, सैनिटायझर, सामाजिक अंतर आणि गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे सर्व त्यांना सांगून हेल्पलाईन नंबर ही दिला जातो. त्यानंतर कोव्हिड व्हॅक्सीन हे एका महिन्याने दुसरा डोस दिला जाणार आहे. सदरचा ड्राय रन रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धूरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत शेरखाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सुतार, सार्वजनिक आरोग्य परिचारिका जान्हवी दुधवडकर, अधिपरिचारिका  श्वेता तारये, परिसेविका पुजा मिशाळे, टेलीमेडीसीन फैसीलिटी मैनेजर पुजा कर्लेकर, हॉस्पिटल मैनेजर श्रीकांत कारंडे, कक्ष सेविका सपना किरण कांबळे, आशा स्वंयंसेविका, ए.एन.एम., व अन्य कर्मचारी यांच्या चमूने यशस्वी केला.