राजापूर | प्रतिनिधी | दि.०९ | अवकाळी पडलेल्या मुसाळधार पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असुन तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणेबाबत आमदार डॉ.राजन साळवी यांनी कृषी मंत्री  दादा भुसे यांना निवेदन दिले. कोकणामध्ये माहे ओक्टोंबर पर्यंत लांबलेल्या व त्यानंतर मोहोर येण्यास पोषक वातावरण नसल्याने म्हणजेच थंडी न पडल्यामुळे ब-याच भागात मोहोर धारणा उशिरा झाली होती. परंतु नव्या वर्षाच्या सुरवातीलाचा अवकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजू वरील मोहर गळुन गेला असुन तुडतुडा व करपा रोगामुळे आंबा व काजूचे मोठयाप्रमाणात नुकसान झाल्यामुळे बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.त्या अनुषंगाने आमदार डॉ.राजन साळवी यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांना निवदेन दिले असुन अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करुन पंचनामा करणेच्या अनुषंगाने संबंधीताना कळवणेबाबत विनंती केली.