रत्नागिरी | दि 26 | ग्रीन रिफायनरी फेरडरेशन ऑफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट फार्डच्यावतीने रत्नागिरी ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प नाणार येथेच व्हावा यासाठी आज 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात येत आहे. फार्डच्यावतीने विविध माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न रिफायनरी समर्थकांनी आपली बाजू मांडण्यासाठी केला होता. परंतु आज पर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. ही भेट मिळावी म्हणून अखेरचा प्रयत्न करावा या हेतूने आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला उपोषणाला करण्यात येत आहे. यामध्ये अनेक प्रतिष्ठित मंडळी उपोषणाला बसली आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.