रत्नागिरी | दि. २९ : लॉकडाऊनच्या काळातील नाकाबंदी दरम्यान रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाटूळ गावच्या ब्रीजवर राज्य उत्पादन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 1 कोटी 60 लाख 80 हजाराची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. बुधवारी संध्याकाळी वाटूळ गावच्या ब्रीजवर ही कारवाई करण्यात आली.

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी मूळचा केरळमधील कसारागोड तालुक्यातील 47 वर्षीय चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईत कंटेनर, दारु आणि मोबाईलसह जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ही 1 कोटी 72 लाख आणि 85 हजार इतकी आहे.