रत्नागिरी | दि. 18

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावातील गडनदीच्या पात्रात तब्बल पाच तासांचा बचावाचा हा थरार रंगला होता. यावेळी गावकरी, पोलिस आणि धाडसी तरूणानं दाखवलेल्या प्रंसगावधानमुळे 83 वर्षीय आजोबा आज सुखरूप आपल्या घरी गेलेत. शिवाय, ग्रामस्थ, पोलीस आणि आजोबांना पुराच्या पाण्यातून आपल्या जीवाची बाजी लावत तरूणान  वाचवलं.

 

‘काळ आला होता पण वेळ नाही’ याचाच प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातील 83 वर्षीय आत्माराम राजाराम घाग यांना आला आहे. राजाराम घाग यांचं मुळगाव चिपळूण तालुक्यातील नायशी. पण, काही कामानिमित्त राजाराम घाग हे संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावी आले होते. सकाळी सात वाचता ते गडनदी किनारी लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दुर्दैवानं त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. पण, त्याचं नशीब बलवत्तर होते. त्यामुळेच नदीतील एका झुडपाचा त्यांना आधार मिळाला. परिणामी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात असलेल्या आजोबांना तब्बल पाच तासानंतर वाचवण्यात यश आलं आहे.