रत्नागिरी | प्रतिनिधी | दि. 22

चिपळूणसाठी सरकारचा रेस्क्यू प्लॅन तयार करण्यात आलाय.  रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना झालेत एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीम थोड्याच वेळात चिपळूणात दाखल होणार. कोस्ट गार्डचा हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करण्यात येणार. पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था केली जाणार आहे. जिवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आलेत.

कोकणातले सर्वच महत्वाचे नेते चिपळुणात होणार दाखल
कोकणातले सर्वच महत्वाचे नेते चिपळुणात होणार दाखल आहेत. खासदार विनायक राऊत तातडीनं दिल्लीहून कोकणासाठी रवाना झालेत. तर  पालकमंत्री अनिल परब सध्या रत्नागिरीत आहेत.

या नद्यांना पूर 

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले.

वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई- गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेय. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी घुसलंय इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणी घुसलंय. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडालेय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.