रत्नागिरी | दि. 04

कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून घडामोडी कायम आहेत. दरम्यान, रिफायनरी विरोधच्या बॅनरनंतर आता रिफायनरीचे समर्थन करणारे बॅनर सध्या राजापूर तालुक्यातील सोलगावात लागले आहेत. गावच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी आम्हाला रिफायनरी हवी असा मजकूर या बॅनरवर लिहिला गेला आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी रिफायनरीच्या नवीन जागेची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यानंतर लगेचच विरोधी समिती स्थापन होत काही गावांमध्ये विरोधाचे बॅनर देखील लागले होते. पण, रिफायनरी समर्थक देखील त्याच कार्यशैलीनं पुढे जात असून  सोलगावमधील रिफायनरी समर्थक यांनी थेट समर्थन करणारे बॅनल लावले आहेत. सारी परिस्थिती पाहता रिफायनरी समर्थक देखील आपला आवाज पोहोचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.