रत्नागिरी | दि. 24

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील चिथावणीखोर वक्तव्यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सध्यातरी नारायण राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.