Posted inकोकण परिसररत्नागिरी जिल्हा न्यूज

कुवारबावमध्ये शिवसेनेला ‘दे धक्का’

राजकीयदृष्टय़ा अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला धोबीपछाड देत गाव विकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. गावविकास आघाडीने थेट सरपंचपदाबरोबर 8 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी गावविकास आघाडीच्या मंजिरी पाडाळकर या 98 मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असले स्वरूप प्राप्त झालेल्या या […]

Posted inकोकण परिसररत्नागिरी जिल्हा न्यूज

सेना-भाजप कधी गद्दारी करत नाही!

सेना व भाजपचा स्वाभीमानचे उमेदवार नीलेश राणे यांनाच आतून पाठिंबा असल्याचे खासदार नारायण राणे यांचे विधान म्हणजे भूलथापा आहेत. सेना-भाजप कधीच गद्दारी करत नाही. नीलेश राणेंचे डिपॉझिट रद्द होण्याची भीती वाटत असल्याने राणे काहीही बोलत सुटले आहेत. त्यांच्या आरोपाकडे लक्ष द्यायचे नसून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवायची असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. […]

Posted inकोकण परिसररत्नागिरी जिल्हा न्यूज

अखेर रत्नागिरीत युतीचे मनोमिलन

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाचे पदाधिकारी राऊत यांना पाठिंबा देणार नाहीत, अशी सुरूवातीला परिस्थिती होती. मात्र खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी उमेदवारीचा अर्ज सादर करण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, राजन तेली यांच्यासह रत्नागिरीतून बाळ माने व त्यांच्या सहकाऱयांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आपल्या जाहीर भाषणात राऊत यांना आपण 6 […]

Posted inरत्नागिरी जिल्हा न्यूज

तब्बल 60 तासांनंतर अपघातग्रस्त टँकर बाहेर

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात घातक रसायन वाहतुकीचा टँकर उलटून पेटलेल्या दुर्घटनेत 5 शेतकऱयांच्या आंबा, काजू, नारळाची झाडे जळून खाक झाली. यात लाखो रूपयांची हानी झाली असून नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. कशेडी-दरेकरवाडीतील 4 ग्रामस्थांच्या घरांनाही आगीची झळ पोहोचली. अपघातग्रस्त टँकरमधील घातक रसायन सुरक्षितरित्या दुसऱया टँकरमध्ये टाकून तब्बल 60 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी दुपारी 12 […]

Posted inकोकण परिसररत्नागिरी जिल्हा न्यूज

कोकण मार्गावर 8 एप्रिलपासून उन्हाळी स्पेशल धावणार

उन्हाळी सुट्टीसाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱया पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून जादा विशेष गाडय़ांची खैरात सुरूच असून आणखी 4 ‘समर स्पेशल’ गाडय़ा जाहीर करण्यात आल्या आहेत. या समर स्पेशल गाडय़ा 8 एप्रिलपासून कोकण मार्गावर धावणार असल्याने चाकरमान्यांसह पर्यटकांच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. सणांच्या तुलनेत उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित रेल्वेगाडय़ांसह चालवण्यात येणाऱया सर्वच विशेष […]

Posted inकोकण परिसररत्नागिरी जिल्हा न्यूज

रत्नागिरी भाजपची भूमिका अधांतरीच

शिवसेना नेत्यांच्या मनमानीमुळे हैराण झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणारी बैठकही रद्द झाली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होईल व त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सेनेचे विनायक राऊत यांचा प्रचार करायचा की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष बाळ माने यांनी दिली. त्यामुळे रत्नागिरी भाजपची युतीबाबतची भुमिका अद्यापही दोलायमान […]